ताज हॉटेल
२६ नोव्हेंबर २००८ चा मूंबईवरील दहशतवाद्यांनी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानदहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेशा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलिस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांनी ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पाकडून परिस्थतीवर नियंत्रण मिळवले.
मुंबई या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला
दहशतवादी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पटिल, नरीज हाऊस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या माघे एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवादी लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला व हातबॉंम्ब फेकले. याव्यतिरित्तक विलेपार्ले येथे एका गाडी मध्ये स्पॉट झाला. या हल्ल्यांमागे लष्कर तोयबा या पाकिस्तान दहशतवादी संघटनेचा हात होता.
प्रतिक्रिया आणि परिणाम:
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील गोळीबाराबद्दल एकूण घाबरलेले कर्मचारी
 निषेध
२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावरील प्रतिक्रिया: अनेक स्तरांवर व विविध प्रकारच्या होत्या. यांत स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील अधिकाऱ्यांची उचलबांगडी, बदल्या तसेच राजकीय बदल शामिल होते. भारतातील जनतेसह मुस्लिम वर्गानेही या हल्ल्यांचा कठोर निषेध केला आणि हे घडवून आणणाऱ्या संस्थांबद्दल संताप व्यक्त केला. वृत्तमाध्यमांतून अनेक आठवडे या घटनेचा पाठपुरावा केला गेला. नेहमीच्या माध्यमांव्यतिरिक्त सोशल मीडियात या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व पडसाद उमटले.या घटनांनंतर बहुतांश शाळा, महाविद्यालये व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई रोखे बाजार व राष्ट्रीय रोखे बाजार नोव्हेंबर २७ रोजी बंद ठेवण्यात आले. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले काही आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांनी आपली मुंबईची उड्डाण रद्द केली.
एन.एस.जी.चे विस्तारीकरण:
डिसेंबर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एन.एस.जी.चे दिल्लीशिवाय इतर शहरांतून विस्तारीकरण करण्याबद्दल चर्चा होईल. हे झाल्यास मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता सारख्या शहरांतून एन.एस.जी.चे कमांडो राहतील व दिल्लीहून प्रवास करण्यात जाणारा मौल्यवान वेळ वाचेल.प्रत्येक एन.एस.जी. कमांडोला वेढा घालण्याचे व वेढा फोडण्याचे प्रशिक्षण दिले जाईल
हॉटेल ताज मे मुंबई हमले को नाकाम करणे वाले एनएसजी कमांडो कि टीम.
|
Nice information
Nice information
Black day😞😞