अणुभट्टी म्हणजे काय: त्याचे भाग आणि त्यांचे कार्य
What is a nuclear reactor? Its parts and their function
आपण ह्या आर्टिकल मध्ये अणुभट्टी म्हणजे काय व त्याचे भाग आणि त्यांचे कार्य हे आपण पहाणार आहे.
अणुऊर्जा हि मोठ्या प्रमाणात वापरली जाते अणुऊर्जेच्या वापराने मोठ्याप्रमाणावर वीजनिर्मिती हि अणुभट्टी च्या सहाय्याने केली जाते. अणुऊर्जा हि अनुच्या साह्याने होत असते. हि ऊर्जा पाणी गरम करण्या साठी वापरली जाते व पाण्याची वाफ झाल्या नंतर त्याच्या पासून वीज निर्मिती हि केली जाते हे कसे खडते व अणुभट्टी म्हणजे काय त्याचे भाग आणि त्यांचे कार्य .
अणुभट्टी म्हणजे काय:
अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणूमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनिअम – 235 या नणुइंधनाचे उदाहरण घेऊ. मंद गतीच्या न्यूट्रॉनांचा मारा कला
असता युरेनिअम 235 ह्या समस्थानिकाच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 व बेरिअम -41 ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. ह्या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी U – 235 केंद्रकांचे
विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात.
1. संचलक / मंदक (Moderator) : न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो.
2. नियंत्रक (Controller) : न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमिअम, बेरिलिअम इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात.
विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक (coolant) म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साहाय्याने टर्बाइन्स चालविले जातात व वीजनिर्मिती होते.
भाग आणि त्यांचे कार्य:
.jpg)
.jpg)

